घसरगुंडी खेळणारे तरुण !
लहानपणी बागेत गेलो की मी पहिला घसरगुंडी कडे पळायचो.पटा पटा शिडी चडायचो.मी वरती पोहोचलोय हे कोणाकोणाला माहितीये कोण माझ्याकडे पाहतय ह्याचा अंदाज घ्यायचो आणि जोरात खाली यायचो. उठायचो खूप आनंदी व्हायचो आणि पुन्हा शिडी चढायला पळायचो.वरती जाऊन बराच वेळ झाला आणि खाली गेलो नाही की मग मागून येणारा दुसरा मुलगा किव्वा मुलगी ढकलून द्यायचे.लक्ष नसायचं मग एकदम खाली जायचो पडायचो. लागायचं.पण ते सगळं तेवढ्यापुरतच. परत उठून माती झटकून खेळायला सुरवात त्याच मित्रांसोबत त्याच उत्साहाने.बागेत चार पाच घसरगुंडी असायच्या जेवढी उंच शिडी चढणार तेवढ्याच उंचीवरून आणि जास्त वेगाने खाली घसरणार . हे मनात पक्के असायचं.
आता पण एक शिडी चढतोय आपण. हा हि शिडी लोखंडाची नाहीये; हि आहे यशाची.सगळेच हळू हळू चढायला सुरुवात करतो ,वरती पोचतो, आपण वरती पोचलोय हे सगळे बघतायत याची खात्री करतो आणि नेमका मजेचा भागच विसरून जातो. तो म्हणजे खाली येणे. बराच वेळ आपण आपली जागाच सोडत नाही. मग कोणी तरी मागून धक्का देत. आपलं लक्ष नसत आपण खाली जातो पडतो,रडतो आणि इथं मात्र परत वरती जाण्याऐवजी भांडण करत बसतो नशिबाला दोष देत बसतो आणि गुढं विचार करण्यात वेळ वाया घालवतो.माझ्याच बाबतीत असं का झालं? मीच का घासरलो?मलाच का लागलं?असे कैक हजारो विचार.नवीन जोमाने वरती जाण्याऐवजी आपण पडण्याच्या भीतीने शिडी चढणंच सोडून देतो.अर्थात थोडेच परत चढतात आणि तेवढेच आनंदी राहतात घासरताना.
किती लहानपणीच शिकवलंय ना घसरगुंडी ने आपल्याला ! पटपट वर जा ,खाली या , मज्जा करा पुन्हा पुन्हा वर जा ,खाली या ,मज्जा करा.
Comments
Post a Comment