रात्र माझी गुणी फार
Engineering ने माझी आणि रात्रीची ओळख करून दिली. आधी परिचय होता थोडा पण मग चार वर्ष ओळख वाढत गेली आणि मी रात्रीच्या प्रेमातच पडलो . तीनही कधी परकं मानलं नाही मग काय दिवसाला दिला कोल आणि रात्री सगळे झोल
अशा अनेक अविस्मरणीय रात्रीसाठी काही ओळी
रात्र माझी गुणी फार ।।
विचारांवर होतो मी स्वार
वाहीपेनाचा घेता आधार
क्षण दोन क्षणात होते दुनिया पार
रात्र माझी गुणी फार ।।
दिवसाची कोडी अवघड प्रश्न
स्वतःच अर्जुन रात्री स्वतःच कृष्ण
दिवसाच्या कृत्यांवर प्रायश्चित्ताचे वार
रात्र माझी गुणी फार।।
रात्र विचारवंतांची, चिकित्सकांची, कलाकारांची
राहस्यांची, गुङांची, प्रहारांची, बचावांची
शोषते साऱ्या थकल्यांचा भार
रात्र माझी गुणी फार।।
शांततेची सखी अंधाराची भागीनी
चंद्राची प्रेयसी झोपेची जननी
मृत्यूनंतरचा एकमेव आधार
रात्र माझी गुणी फार ।।
Comments
Post a Comment