Skip to main content

Posts

Featured

प्रेमाचे फुल

लहानपणापासून प्रेम आलं की मागोमाग गुलाब येतो अश्यावेळी नेहमी तूच का?? ह्यावर बाकीच्या फुलांचे आणि गुलाबाचे भांडण मी या कवितेतून मांडले आहे. एकदा सगळ्या फुलांसोबत गुलाबाचे झाले वैर सगळेच्या सगळे बिचाऱ्या गुलाबाशी भांडायला झाले स्वैर विचारू लागली फुले गुलाबा कोणती ऐसी जादू केली कोणत्या ऐशा गुणकाराने प्रियकराने तुझी निवड केली आमचा हि रंग चांगला दिसायलाही आहोत बरे वास तर तुझ्याहून चांगला मग तुझाच मोह त्याला का पडे गुलाब हसला जरासा अन रहस्य खोलू लागला काय कारण कि प्रियकर त्याच्याच मागे भागला गुलाब फुलांना म्हणाला दिसायला तर चांगले आहेतच लाखपटीने वास छान हा काट्यांचे महत्व जास्त कळले प्रेम करता प्रियकारा सुखी क्षणांच्या सोबत असणे म्हणजे काही प्रेम नव्हे दुःख सोसता घट्ट होणारे पक्के प्रेयसीला प्रेम हवे फुलांस पटले भांडण निजले फुलगण एकमेकात कुजबुजला सुखदुःखांची साठवण म्हणून गुलाब प्रेमाचे फुल बनला गुलाब प्रेमाचे फुल बनला ...

Latest posts

शोधणाऱ्याला सापडतच !!

फुग्यांची गाडी 

घसरगुंडी खेळणारे तरुण !

रात्र माझी गुणी फार 

अकेला रास्ता

Singing bike

What's on your mind